Thursday, 17 September 2020

ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Elder Sister)

ताईला छोट्या बहिणीकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Elder Sister)


%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%9B%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A5%81%E0%A4%AD%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9B%E0%A4%BE-Birthday-Wishes-For-Elder-Sister

भावाबहीणीच्या नात्याहून कित्येक पटीने जास्त माया असते ती बहिणींच्या नात्यात. एकाच गोष्टीवरून मला हवी मला हवी म्हणून सतत भांडणाऱ्या पण थोडंही लांब गेल्यावर एकमेंकींच्या आठवणीने हळहळणाऱ्या असतात त्या बहिणी.

1) सागरासारखी अथांग माया भरलीय तुझ्या हृदयात..
कधी कधी तर तू मला आपली आईच वाटतेस..
माझ्या भावनांना, केवळ तूच समजून घेतेस..
माझ्या जराशा दुःखाने, तुझे डोळे भरून येतात..
अशी माझ्याबद्दल हळवी असणारी दीदी तू,
कधी कधी प्रसंगी, खूप खंबीरही वाटतेस..
मनात आत्मविश्वास, तुझ्यामुळेच जागृत होतो..
तूच आम्हाला धीर देतेस…
तू नेहमी सुखात रहावी हीच सदिच्छा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

2) माझी बहीण माझ्याशी भांडते, पण माझ्याशी काहीही न बोलता माझं सगळं समजून घेते आणि आज आमच्या खडूस छोटीचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे छोटी.  

3) सुंदर नातं आहे तुझं माझं, नजर न लागो आपल्या आनंदाला, हॅपी बर्धडे बहना

4) मोठी बहीण असते आईबाबांपासून वाचवणारी 
आणि छोटी बहीण असते सिक्रेट्स लपवणारी
हॅपी बर्थडे क्युट सिस्टर 

5) प्रत्येक गोष्टींवर भांडते, नेहमी नाक मुरडते. पण जेव्हा वेळ येते तेव्हा माझीच बाजू घेते माझी क्युट बहीण. खूप खूप प्रेम लाडके, हॅपी बर्थडे ढमे. 

मैत्रिणींकडून वाढदिवसाच्या मजेदार शुभेच्छा (Birthday Wishes In Marathi For Friend) 


birthday-wishes-for-friend-in-marathi %282%29

प्रत्येक ग्रुपमध्ये एखादा तरी अशी मैत्रीण असतेच जिच्या खाण्याच्या सवयीमुळे ती ग्रुपमध्ये फेमस असते. अशा मैत्रीणीच्या नावे पुढील मजेदार शुभेच्छा.

1) वाढदिवसासाठी भेट निवडताना काही राहु नये म्हणुन संपुर्ण डबाच तुझ्यासाठी पाठवलाय!
यशस्वी व औक्षवंत हो!
वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

2) प्रेमाच्या या नात्याला
विश्वासाने जपून ठेवतो आहे
वाढदिवस तुझा असला तरी
आज मी पोटभर जेवतो आहे
हॅपी बर्थडे

3) जल्लोश आहे गावाचा,
कारण वाढदिवस आहे,
माझ्या मैत्रीणीचा!!!
वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा…!

4) आयुष्यात सगळी सुख तुला मिळो फक्त मला बर्थडे पार्टी द्यायला विसरू नको. हॅपी बर्थडे

5) जे देवाकडे मागशील तू ते तुला मिळो हीच आज देवाकडे मागणी आहे माझी. वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. 

पत्नीकडून पतीला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Birthday Wishes For Husband)


आपले आईबाबा आणि भावंडानंतर आपलं सर्वस्व स्त्री ही तिच्या नवऱ्याला देऊ करते. जगाच्या रीतीप्रमाणे माहेराहून सासरला येते. आपल्या पतीच्या घराला आणि कुटुंबाला आपलंस करते. अश्याच एका जीवापाड प्रेम करणाऱ्या पत्नीने पतीसाठी दिलेल्या शुभेच्छा…

1) कितीही रागावले तरी समजून घेतले मला,
रुसले कधी तर जवळ घेतले मला,
रडवले कधी तर कधी हसवले,
केल्या पूर्ण सर्व माझ्या इच्छा,
वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!

2) तुझा चेहरा जेव्हा समोर आला तेव्हा माझं मन फुललं, देवाची आभारी आहे ज्याने तुझी माझी भेट घडवली. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. 

3) आयुष्यातील खास शुभेच्छा घे, वाढदिवसाच्या निमित्ताने खास गिफ्ट्स घे, तुझं आयुष्य अनेक रंगांनी भरू दे. तुला स्वीट हॅपी बर्थडे 

4) Life मधील प्रत्येक Goal असावा Clear,
तुला Success मिळो Without any Fear
प्रत्येक क्षण जग Without any Tear,
Enjoy your day my Dear,
हॅपी बर्थडे 

5) या  Birthday ला तुला प्रेम, सन्मान आणि स्नेह मिळावा, आयुष्यातील सर्व आनंद मिळावा माझ्या प्रिय पतीदेव…HAPPY BIRTHDAY

नवऱ्याकडून बायकोला वाढदिवसाच्या शुभेच्छा (Brithday Wishes For Wife)


Brithday-Wishes-For-Wife-in-marathi

तोही तिच्या प्रेमाला पूरक वागायचा, तिला वेळोवेळी नव्या घरात सांभाळून घेण्याचा प्रयत्न करतच असतो. आपल्या सहचारिणीसाठी आपला प्रत्येक क्षण देण्याचा तोही प्रयत्न करत असतो. प्रत्येक नवऱ्यासाठी आपल्या बायकोचा वाढदिवस म्हणजे एक सणच असतो नाही का? कारण नवरा जर बायकोचा वाढदिवस विसरला तर त्याची काही खेैर नसते. तिचं आपल्या आयुष्यात किती महत्वाचं स्थान आहे, अशीच काहीशी कबुली देणारा पुढील संदेश…

1) तू नव्हतीस तेव्हाही मी जगतच होतो.
नाहीच असं नाही पण तुझ्या
येण्याने आयुष्याची बाग खर्‍या अर्थाने बहरून आली….
पूर्वीचेच क्षण तुझ्या सहवासात नव्या आनंदाने बहरून आले…
पूर्वीचेच दिवस तुझ्याप्रमाणे नव्या चैतन्याने सजून गेले…
आता आणखी काही नको,
हवी आहे ती फक्त तुझी साथ आणि तुझ्या प्रेमाचं अनमोल नातं !
बस्स ! आणखी काही नको… काहीच !
वाढदिवसाच्या प्रेमशुभेछा !

2) पऱ्यांसारखी सुंदर आहेस तू
तुला मिळवून मी झालो धन्य
प्रत्येक जन्मी तूच मला मिळोवी
हीच आहे माझी एकमेव इच्छा तुझ्या वाढदिवशी 

3) तुझ्या येण्याने आयुष्य सुंदर झालं आहे 
हृदयात माझ्या तुझी सुंदर छबी आहे 
चुकूनही जाऊन नकोस माझ्यापासून लांब
प्रत्येक पावलावर मला तुझी गरज आहे. हॅपी बर्थडे 

4) हसणाऱ्या हृदयातही दुःख आहे 
हसणाऱ्या डोळ्यातही कधी अश्रू येतात
पण मी एकच प्रार्थना करेन तुझं हसू कधीच थांबू नये कारण तुझ्या हास्याचे आम्हीही दिवाने आहोत. 

5) सुगंध बनून तुझ्या डोळ्यात सामावेन, समाधान बनून तुझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देईन
समजून घेण्याचा प्रयत्न करत दूर राहूनही मी तुझ्यासोबतच असेन. वाढदिवसाच्या शुभेच्छा. 

Previous
Next Post »

Recent Articles